Ad will apear here
Next
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा
पुणे : ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स कॉंग्रेस’च्या पुणे उत्तर शाखेतर्फे पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्यावसायिकांचा राजकारणात सहभाग’ असा निबंध स्पर्धेचा विषय असून १५ फेब्रुवारीपर्यंत ई-मेलद्वारे किंवा संपर्काद्वारे निबंध पाठवणे अपेक्षित आहे. 

१८ ते २५ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यापैकी कोणत्याही भाषेत निबंध पाठवता येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी aipcpuneevents@gmail.com या ई-मेल आयडीवर निबंध पाठवण्याचे किंवा ९८५०९ ३३६५४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. 

स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकाच्या निबंधांना अनुक्रमे रोख रक्कम रुपये पाच हजार, तीन हजार व दोन हजार तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बक्षीस समारंभ २३ फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता पौड रोड येथील भारती विद्यापीठातील ‘अभिजित कदम मेमोरियल ऑडिटोरियम’ याठिकाणी होईल. राजकारणात व्यावसायिकता यावी या उद्देशाने ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स कॉंग्रेस’ची स्थापना करण्यात आली आहे. डॉक्टर्स, अभियंते, वकील यांसारख्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी राजकारणात सहभाग घेऊन राजकारणाचा दर्जा वाढवावा यासाठी या संघटनेमार्फत कार्य केले जाते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZUMBX
Similar Posts
रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे विद्यार्थ्यांसाठी २५ ऑगस्टला निबंध स्पर्धा रत्नागिरी : ग्राहक प्रबोधनाच्या हेतूने रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे आठवी ते दहावी आणि अकरावी-बारावी या दोन गटांत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत फाटक हायस्कूल येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
‘मनःसृष्टी’तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन पुणे : ‘मन:सृष्टी - सेंटर फॉर सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट अँड स्टडिज’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्षमा’ हा यंदाच्या निबंध स्पर्धेचा विषय असून या विषयावरील निबंध ३१ जुलैपर्यंत मनःसृष्टीच्या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष निखिल वाळकीकर यांनी केले आहे
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language